जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालये व पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालय शनिवार दि. २७ मार्च, २०२१ या शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीसाठी सुरू राहणार आहे.
तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग २ तथा पाचोरा प्रशासकीय अधिकारी सुनील मधुकर पाटील यांनी केले आहे.