जळगाव (प्रतिनिधी) शहरातील डिस्प्ले अँड व्हिजन तर्फे ‘डोंगर वणिचा’ या गाण्याचे बालानी लॉन्स येथील हॉटेल इन्फिनिटी येथे मंगळवारी थाटात विमोचन करण्यात आले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे सदस्य अरविंद देशमुख, समाजसेवक प्रकाश बालानी, अनिल जोशी, ज्ञानेश्वर सोनवणे, आनंद महिरे आदी उपस्थित होते. यावेळी अरविंद देशमुख व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. गायिका डॉ. कविता ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ईशान जोशी यांनी केले. आभार अनिल जोशी यांनी मानले.
या गाण्याचे दिग्दर्शन विनोद सोनवणे, गोपाल जोशी यांनी केले आहे. छायाचित्रण अजय दुसाने, नितीन वाल्हे यांचे आहे. यात समिक्षा अहिरे, दिशांत वानखेडे या प्रमुख कलाकारांसह आराध्या जोशी, प्रव्या सोनवणे,आदित्य सोनवणे, देवांशी सोनवणे, हिमानी परदेशी,विश्वरत्न आंबेकर, मेहेक तिडके या बाल कलाकारांनी सहभाग घेतला आहे. संगीत दिशांत वानखेडे, संगीत संयोजन उदय सूर्यवंशी, शुभम जोशी यांचे असून गायक म्हणून कविता ठाकूर (पुणे) निलेश जोशी हे लाभले आहेत.तरी या गीताला खानदेश वासियानी प्रतिसाद द्यावा, अशी विनंती कलाकारांतर्फे करण्यात आली आहे.