धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ५ जून २०२१ वार शनिवार रोजी राजस एंटरटेनमेंट व ड्रीम ऑडिओ वर्क स्टेशन जळगाव प्रस्तुत “महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील” हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार आहे.
त्या गाण्याची निर्मिती धरणगाव येथील प्रसिद्ध चारुदत्त राजेंद्र पाटील (डी.जे. गोलू ) याने केली असून गीतकार व गायक नाशिक येथील प्रसिद्ध कर मन्ह लगन फेम भैय्यासाहेब मोरे यांनी गायन केले आहे. संगीत जळगाव येथील जितू गायकवाड यांनी दिले आहे. तसेच रेकॉर्डिंग ड्रीम ऑडिओ वर्क स्टेशन येथील चि. प्रमोद महाजन व चि. लखन हिरे यांनी केले आहे.
या गाण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, विक्रम गुलाबराव पाटील राजस ग्राफिक्सचे संचालक निलेश राजेंद्र पाटील, डायरेक्टर प्रदीप भोई जळगाव, गुलाबराव पाटील फाऊंडेशन जळगाव/पाळधी व ऋषी ग्राफिक्स पाळधी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. हे गाणे डी.जे. गोलू यांच्या Rajas Entertainment या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तरी सर्व ना. गुलाबराव पाटील यांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी येत्या ५ जून ला नक्की गाणे ऐकावे असे गाण्याचे निर्माते डी. जे. गोलू धरणगाव यांनी आवाहन केले आहे.
















