जळगाव (प्रतिनिधी) ‘न्यूज अरेना’ (News Arena India) या संस्थेने राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात एक सर्वे केला असून भाजप सत्तेत येईल असं भाकित वर्तवलंय. जळगाव जिल्ह्याचा विचार करता भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतील असं या सर्वेमध्ये सांगितलं आहे. (Jalgaon political news)
जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदार संघात कोण मारणार बाजी !
‘न्यूज अरेना’ या संस्थेच्या सर्वेनुसार जळगाव जिल्ह्यात भाजप ६, राष्ट्रवादी ३ तर शिवसेना (शिंदे गट) २ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. चोपडा या मतदार संघात राष्ट्रवादी बाजी मारणार असून याठिकाणी शिवसेनेला (शिंदे गट) धोका निर्माण झाला आहे. रावेरमध्ये भाजप पुन्हा एकदा आपला गड परत मिळविणार असून याठिकाणी कॉंग्रेस पराभूत होणार आहे. भुसावळ आणि जळगावमध्ये भाजप पुन्हा एकदा आपला गड कायम राखण्यात यशस्वी होत आहे.
जळगाव ग्रामीण आणि एरंडोलमध्ये शिवसेना (शिंदे गट) देखील आपला गड कायम राखताना दिसत आहेत. अमळनेरमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसणार असून भाजप याठिकाणी विजयी होत असल्याचे म्हटले आहे. चाळीसगाव आणि जामनेरमध्ये भाजपा पुन्हा एकदा विजयी पताका फडकावणार तर पाचोरा आणि मुक्ताईनगरमध्ये मात्र, राष्ट्रवादी विजयी होणार असल्याचेही ‘न्यूज अरेना’ना आपल्या सर्वेत म्हटले आहे.
दरम्यान, न्यूज अरेना या संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये भाजप राज्यात बहुमताने सत्ता स्थापन करणार असं सांगितलं आहे. भाजपला 123 ते 129 शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फक्त 17 ते 19 आणि इतर तसंच अपक्ष उमेदवारांना 12 जागा मिळतील असं भाकीत करण्यात आलंय.
North Maharashtra/ Khandesh (47 seats)
BJP : 23
SS : 3
SSUBT : 0
INC : 6
NCP : 14
OTH : 1Nandurbar -BJP : 2, INC : 2
1. Akkalkuwa (ST) : INC
2. Shahada (ST) : BJP
3. Nandurbar (ST) : BJP
4. Navapur (ST) : INCDhule – BJP : 5
5. Sakri : BJP
6. Dhule Rural : BJP
7. Dhule…— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023