फैजपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिक्षकांनी रावेर विधानसभा मतदार संघाचे आ. शिरीष चौधरी यांना त्यांच्या खिरोदा तालुका रावेर येथील निवासस्थानी भेट दिली. तसेच दिनांक १० जुलै २०२० ची अधिसूचना रद्द करून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा तुकडीवर नियुक्त व शंभर टक्के अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी दिलेल्या समर्थन पत्राबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
तसेच लवकरच पेन्शनचा निर्णय होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना पुनश्च आग्रही शिफारस करण्याची विनंती केली. यावेळी आमदार साहेबांनी स्वतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी यावल पंचायत समिती काँग्रेसचे गटनेते शेखर पाटील, शिक्षण संघर्ष संघटनेचे जयंत चौधरी, ललित चौधरी, ए. डी. पाटील, शेख अशपाक, मुख्याध्यापक शरीफ मलक, तुफेल अहमद, गणेश गुरव, के. जी. चौधरी, ललित कुमार फिरके यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रास्ताविक शरीफ मलक यांनी, सूत्रसंचालन गणेश गुरव तर आभार जयंत चौधरी यांनी मानले.