चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील प्रभाग क्रमांक १५ मधील भव्य दिव्य असे ५० लक्ष रुपये खर्चाच्या बगीच्याचे लोकार्पण आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रभागातील विविध नविन रस्त्यांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
वाल्मिक नगर येथे झालेल्या कार्यक्रमात यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, माझ्या काळात प्रभाग १४ व प्रभाग १५ मध्ये अनेक विकासकामे केली असून त्यातील आज भव्य अशा बगीच्याचे लोकार्पण होत असून लवकरच ५ कोटींच्या निधीतून परिसराला शाप ठरलेल्या नाल्याचे प्रथम टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात येईल तसेच कब्रस्तानाचे ४० वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावत कंपाऊंडही केले असे त्यांनी सांगितले व येणा-या काळात अशीच साथ आपण दिली तर तुमच्या प्रभागाचा विकास कोणीही रोखू शकणार असे सांगितले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रभागातील समाजसेवक अमोल चौधरी यांनी प्रभागात सुरु असलेल्या विविध कोटी रुपयांच्या विकास कामांचा उल्लेख करत विकास कार्याची घौडदौड अशीच सुरु राहील असे सांगितले तसेच मनोगतात अजिज खाटीक व असलम मिर्झा यांनी आमदार मंगेश चव्हाण व अमोल चौधरी यांचे विविध विकास कामांबद्दल ऋण व्यक्त केले तर सुत्र संचालन व आभारप्रदर्शन वसिम शेख यांनी केले.
यावेळी परिसरातील हिंदू-मुस्लिम समाज बांधवांनी आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार केला यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी,भाजप शहराध्यक्ष नितिन पाटील,संगिता गवळी,नदीम खान,नूरोद्दीन शेख,अजगर सैय्यद,रणजित देशमुख,राकेश बोरसे,अकलाख खाटीक,बाबा पवार, अक्रम बेग मिर्झा,बिलाल काकर,अमजद पठाण,अॕड.कैलास अगोणे,सुनिल पाटील,मयुर चौधरी,इम्रान पठाण, राजेंद्र पाटील,शांताराम पाटील, देविदास वाणी,दाऊद शेख व परिसरातील अनेक हिंदू-मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.