धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील रुख्मिणी नगर, बस स्टँड जवळून मोटार सायकल चोरी नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात गोविंदा बाळू पाटील (वय ३०, रा. प्लॉट नं.३४, कृष्ण कॉटेज सद्गुरू नगर, जुनी एमआयडीसी जळगाव ह.मु. प्लॉट नं ३३ रुख्मिणी नगर, बस स्टँड जवळ पाळधी खु ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १०. वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने प्लॉट नं ३३ रुख्मिणी नगर, बस स्टँड जवळून ३० हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची निळ्या काळ्या रंगाची त्यावर सिल्वर रंगाचे पट्टे असलेली एच एफ डिलक्स मोटार सायकल तिचा नोंदणी क्रमांक एम.एच १९, सी.एम. ८२६६ संमतीवाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुंभ करीत आहेत.