धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धनगर गल्लीजवळील घोडे गल्लीत रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थेवरून शिवसैनिक शिवसेनेचे उपशहर प्रमुख पप्पू कंखरे यांनी प्रश्न उपस्थीत करत संताप व्यक्त केला आहे.
धरणगाव शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची जोरात सुरू असूनही फक्त आमच्या घोडे गल्लीतच रस्त्याचे काम केले जात नाहीय. वरिष्ठांना विचारले असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात येतात. मग दाद मागायची तर कोणाकडे मागायची?, असा प्रश्न शिवसेनेचे उपशहर प्रमुख पप्पू कंखरे यांनी विचारला आहे. तसेच पालिका प्रशासन आणि नगरसेवकाकडून होत असलेल्या दुजाभाव बाबत देखील त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.