जळगाव (प्रतिनिधी) खेळाडूंनी कोणताही खेळ चिकाटी व सातत्य ठेवून खेळले व बुद्धिबळ सारखा खेळ खेळल्यास खेळाडू हा आपले चांगले करिअर घडवु शकतो त्यामुळे चांगले खेळ खेळा व त्याला आपल्या जीवनात आत्मसात करा असे भावनिक आवाहन जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकसंघर्ष मोर्चा आयोजित शिवजयंतीनिमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, डॉ. ए जी भंगाळे, डॉ. विकास बोरोले, साजिद शेख, एडवोकेट विजय पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख, अंकुश रक्ताळे, अनिस शाह, मुकुंद भाऊ सपकाळे, विष्णू भंगाळे, अयाझअली, मुकेश टेकवानी, दीलीप सपकाळे, अमोल कोल्हे, स्मिता वेद सह आर्बिटर प्रवीण ठाकरे यांची उपस्थिती होती. समारोपीय प्रस्तावना लोक संघर्षाच्या प्रतिभा शिंदे यांनी सादर केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख यांनी केले.
स्पर्धेतील विजयी खेळाडू
आठ वर्षे वयोगट
१ परम मुंदळा ५००/-
२अजय पाटील जळगाव ३००/-
दहा वर्षे वयोगट
प्रथम तहसीन तडवी जळगाव ५००/
द्वितीय देवानं राजगुरू, मेहकर ३००/
तृतीय धैर्य गोला जळगाव २००/-
बारा वर्षे वयोगट
प्रथम जयेश सपकाळे ,जळगाव ५००/
द्वितीय शेरोन ठाकूर, चोपडा ३००/-
तृतीय कोकणे भिवा ,धुळे २००/-
पंधरा वर्षे वयोगट
प्रथम दिघ्नाड वाघ, धुळे ५००/-
द्वितीय उज्वल आमले, जळगाव ३००/-
तृतीय पूर्वा जोशी जळगाव २००/-
उत्कृष्ट महिला गट
प्रथम क्रमांक काबरा श्रुती, ५००/
जळगाव द्वितीय भुसावळ गुर्मीत कौर ३००/-
तृतीय धुळ्याची खुशबू कोकाने २००/-
खुल्या गटातील प्रथम दहा विजयी खेळाडू
प्रथम क्रमांक जळगावची भाग्यश्री पाटील ५०००/-
द्वितीय क्रमांक जळगाव बुधवंत कासार ३०००/-
तृतीय क्रमांक औरंगाबाद इंद्रजीत महिंद्रकर २०००/-
चौथा क्रमांक नंदुरबार वैभव बोरसे १५००/-
पाचवा क्रमांक जळगाव केतन पाटील १०००/-
सहावा क्रमांक नागपूर ईश्वर रामटेके ९००/-
सातवा क्रमांक जळगाव तेजस तायडे ८००/-
आठवा क्रमांक जळगाव रवींद्र दशपुत्रे ७००/-
नववा क्रमांक नंदुरबार ऋषिकेश सोनार ६००/-
दहावा क्रमांक जळगाव ची सानिया रफिक तडवी ५००/-
एकूण २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक या खेळाडूंना देण्यात आले. या स्पर्धेमध्ये सर्वात लहान खेळाडू म्हणून जळगावचा परम मुंदळा व सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून नागपूरचे ७६ वर्षे वय ईश्वर रामटेके यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रवीण ठाकरे सह फारुक शेख, रवींद्र धर्माधिकारी, परेश देशपांडे, अंकुश रक्ताळे व शर्वरी दशपुत्रे यांचा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. विजयी सर्व खेळाडूंना उपरोक्त सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. लोकसंघर्षतर्फे बाहेरून आलेल्या खेळाडूंची राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती.