TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वॉशिंग्टन पोस्टचा खळबळजनक खुलासा ; रोना विल्स यांचा लॅपटॉप हॅक करून कागदपत्र ठेवले

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) एल्गार परिषद प्रकरणात बुधवारी वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीने पुणे पोलिस व राष्ट्रीय तपास यंत्रणेला धक्का बसला. विल्सन यांचा लॅपटॉप त्यांच्या अटकेआधी हॅक करुन त्यामध्ये काही चिथावणीखोर ईमेल प्लान केले आहेत, त्यात देशविरोधात बंड पुकारणे, मोदी यांची हत्या या स्वरुपाचे १० दस्तावेज टाकले होते, असा खळबळजनक खुलासा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. यामुळे पुणे आणि एनआयएच्या तपासावर प्रश्न निर्माण होत आहे.

रोना विल्सन यांना अटक होण्याअगोदर सायबर हल्लेखोरांनी विल्सन यांचा लॅपटॉप हॅक करून त्यात देशविरोधात बंड पुकारणे, मोदी यांची हत्या या स्वरुपाचे १० दस्तावेज टाकले होते, असा खळबळजनक खुलासा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. हे दस्तावेज मूळ विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये नव्हते, त्यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी त्यांचा लॅपटॉप हॅक केला, असा अहवाल अमेरिकास्थित डिजिटल फॉरेन्सिक फर्म आर्सेनल कन्सल्टिंगने दिला असल्याचे वॉशिंग्टन पोस्टचे वृत्त आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

आरोपींच्या लॅपटॉपमधील हार्ड डिस्कचा अहवाल अमेरिकेतील अर्सेनेल कन्सल्टन्सी या खासगी कंपनीने उघड केला आहे. विल्सन यांच्या लॅपटॉपचाही यामध्ये समावेश आहे. यामधील अनेक वादग्रस्त आणि खळबळजनक अशा कथित तपशीलाचा अहवाल आता जाहीर करण्यात आला आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट या आरोपींनी केला होता. असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र विल्सन यांचा लॅपटॉप त्यांच्या अटकेआधी हॅक करुन त्यामध्ये काही चिथावणीखोर ईमेल प्लान केले आहेत. विल्सन यांचे वकील सुदीप पासबोला यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, आर्सेनलचा अहवालच आमचा अशील निर्दोष असल्याचा भक्कम पुरावा असून सरकारचे सर्व दावे पोकळ असल्याचे ते दर्शवत आहेत. विल्सन यांच्या वकिलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात आर्सेनलचा अहवाल सादर करून विल्सन यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करावा अशी याचिकेद्वारे मागणी केली आहे.

तर राष्ट्रीय तपास आयोगाच्या प्रवक्त्या जया रॉय यांनी विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये अशी कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे आढळून आले असून आमच्या संस्थेकडे भीमा कोरेगाव खटल्यातील आरोपींविरोधात सबळ कागदपत्रे व तोंडी पुरावा असल्याचे सांगितले. तसेच एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे आदिवासी, दलित यांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते असून ते मोदी सरकारचे कठोर टीकाकार आहेत. या सर्वांनी त्यांच्यावर पोलिसांनी लावलेले देशद्रोहासकट अन्य आरोप अनेकवेळा फेटाळले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रवक्त्या डॉ. जया रॉय यांनी द वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना म्हटलं की विल्सन यांच्या लॅपटॉपचा फॉरेन्सिक तपास करताना त्यांना कुठल्याही प्रकारचं घातक सॉफ्टवेअर आढळलं नाही. तसंच सर्व आरोपींविरोधात “पुरेशी कागदपत्रं आणि तोंडी पुरावे” आहेत, असंही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा पोलिसांचा दावा

या १० दस्तावेजांच्या आधारे विल्सन यांना नंतर पोलिसांनी अटक केली होती. आणि हे दस्तावेज भीमा-कोरेगाव प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे म्हणून पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आहे. या १० दस्तावेजांच्या आधारावर पुणे पोलिसांनी विल्सन यांच्यासमवेत अन्य १५ जणांना अटक केली होती. या सर्वांवर मोदी सरकार उलथवण्याचा आरोप ठेवण्यात आला असून गेली दोन वर्षे ते तुरुंगात आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचाही पोलिसांचा दावा होता. गेल्या जुलै महिन्यात विल्सन यांच्या बचाव पक्षाने आर्सेनल कन्सल्टिंग फर्मला इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची शहानिशा करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार आर्सेनलने सायबर हल्ला झाल्याचे स्पष्ट केले आहे. हा हल्ला कोणी केला याची माहिती आर्सेनलने दिलेली नाही. पण वॉशिंग्टन पोस्टने आर्सेनलच्या दाव्याची शहानिशा करण्यासाठी अन्य तीन तज्ज्ञांचे मत अजमावले, त्यांनी आर्सेनलच्या पुराव्यावर सहमती दर्शवली आहे.

विल्सन प्रकरण नेमके काय आहे?

विल्सन यांच्या लॅपटॉपमधून पोलिसांना जो दस्तावेज सापडला होता, त्यात मोदी यांची हत्या करण्यासाठी गन्स व दारुगोळा मिळावा अशी मागणी करणारे विल्सन यांचे माओवादी संघटनांना विनंती करणारे एक पत्र होते. पण ही १० पत्रे सायबर हॅकरनी विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये एका हिडन फोल्डरमध्ये लपवून ठेवली होती. हे काम सुमारे दोन वर्षे हॅकरकडून सुरू होते, असे आर्सेनलचे तपासाअंती मत आहे. पुराव्याची छेडछाड कशी केली जाते, याचे अत्यंत गंभीर उदाहरण असल्याचे आर्सेनलने म्हटले आहे. सायबर हॅकरनी दोन वर्षांत विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये कसा शिरकाव केला व त्यात १० दस्तावेज कसे समाविष्ट केले याचा साद्यंत अहवाल आर्सेनलने तयार केला आहे. एक प्रसंग जून २०१६चा असून विल्सन यांना त्यांच्या काही ओळखींचे मेल आलेले दिसून आले. हे मेल उघडावेत अशी विनंती विल्सन यांच्या एका मित्राने त्यांना केली. हा मेल सिविल लिबरटिज ग्रुपचा असून तो उघडावा असे विल्सन यांना सांगण्यात आले. त्यांनी मित्राच्या सांगण्यावर त्या मेलवरील लिंकवर क्लिक केले, त्या बरोबर मेलद्वारे नेट वायर (NetWire) नावाचे एक सॉफ्टवेअर विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये डाऊनलोड झाले व त्यामुळे हॅकरना विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये घुसखोरी करणे शक्य झाले. दरम्यान, याबाबत ‘द वायर’नेही आज वृत्त प्रकाशित केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : सी.बी.निकुंभ विद्यालयाचा निकाल ८१.९१ टक्के !

June 7, 2023

नांदेडमध्ये महाप्रसादातून ११४ भाविकांना विषबाधा, १२ जण गंभीर !

May 17, 2024

प्रवीण दरेकरांच्या अडचणी वाढणार ; त्या प्रकरणात ऑडिट होणार

March 2, 2021

गुलाबचंद देशलहरा यांच्या नऊ उपवासाची सांगता !

July 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group