जळगाव (प्रतिनिधी) सुबोनियो पक्षी घराचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री सुरेश दादा यांच्या हस्ते संपन्न आज मेहरून तलाव जळगाव येथे आज संपन्न झाला.
जळगाव महानगरपालिका, सुबोनियो केमिकल लिमिटेड व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून मेहरून तलाव परिसरामध्ये सात मजली भव्य दुनिया पक्षी घर उभारण्यात आले असून पक्षी घराचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते आज संपन्न झाला. या प्रसंगी माजी आमदार ऍड.जयप्रकाश बाविस्कर, सुबोनियोचे संचालक सुबोध कुमार चौधरी, सुनील कुमार चौधरी, सुयोग चौधरी, सुमोल चौधरी, हिरा सुबोध चौधरी, सारिका सुनील चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी,सौन्दर्या चौधरी, संजना चौधरी मंचावर उपस्थित होते.
लोकसभागातून विकास या संकल्पनेतून मेहरून तलावाच्या निसर्गरम्य परिसरात सात मजली भव्य असे २५०० घरटे असलेलं ऐतिहासिक सुबोनियो पक्षी घर जळगावच्या सौंदर्यात भर घालणार आहे.मराठी प्रतिष्ठान सारख्या सामाजिक संस्थांच्या मागे मी सदैव उभा राहील असे प्रतिपादन सुरेश दादा जैन यांनी याप्रसंगी केले. दुनिया पक्षी घर उभारण्याकरता तांत्रिक मदत करणारे आर्किटेक इम्रान देशमुख व मनपा अभियंता संजय नेमाडे यांचे सुरेशदादा जैन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान फलक अनावरणानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशामध्ये कबूतर सोडण्यात आले. रमेश पहिलानी कराओके ग्रुप तर्फे सुंदर गाण्यांचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले.लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेविका सुचिता हाडा, उद्योजक मुकेश टेकवाणी, प्रदीप आहुजा, सुशील नवाल श्याम कोगटा, प्रवीण पगारिया डॉक्टर धनंजय बेंद्रे, अमर जैन, अमर कुकरेजा, विराज कावडीया, आनंद मराठे, किशोर जाधव, अशोक जाधव, आरिफ देशमुख, शकील देशपांडे, बंटी बुटवाणी मतीन पटेल, शाहिद सय्यद,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकार्पण सोहळा यशस्वीतेसाठी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, विश्वस्त नीलोफर देशपांडे,डॉ सविता नंदनवार (प्राध्यापिका बेंडाळे कॉलेज) यांनी नियोजन केले.