जळगाव (प्रतिनिधी) शिवाजी नगरातील उमर कॉलनी परिसरातून पाण्याचे इलेक्ट्रिक मोटर व लोखंडी पलंग चोरून येण्याची घटना गुरुवारी 25 जुलै रोजी सकाळी आठ वाजता समोर आली याप्रकरणी शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुलाम दस्तगीर हबीब खान (वय 56 रा. उमर कॉलनी, शिवाजीनगर जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवारी 25 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोर असलेली इलेक्ट्रिक मोटार आणि लोखंडी पलंग असा एकूण 3 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सकाळी 8 वाजता समोर आली. याप्रकरणी गुलाम दस्तगीर हबीब खान यांनी शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.
















