जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्वच तालुका अध्यक्षांनी बैठकीत महायुतीच्या शिंदे गट व भाजपच्या उमेदवारांनी आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस – अजितदादा गट) योगेश देसले यांनी मांडली. यामुळे महायुतीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
राज्यातल्या सध्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा बैठक संपन्न झाली. जळगाव लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुकाध्यक्ष, विधानसभाक्षेत्र प्रमुख, तसेच जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांसह सर्वच सेलचे जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय पवार हे होते.
….तोपर्यत आम्ही जाहीर प्रचारात उत्तरणार नाही : योगेश देसले !
सर्वच तालुका अध्यक्षांनी बैठकीत महायुतीच्या शिंदे गट व भाजपच्या उमेदवारांनी आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका मांडली. याच विषयांचा धागा पकडून जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी बैठकीत सर्वांना आवाहन केले व आपलं म्हणणं पक्षनेतृत्वाला कळविले जाईल असे सांगितले. मात्र जो पर्यत शिंदे गटाचे उमेदवार व भाजपाचे उमेदवार आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणार नाही तोपर्यत आम्ही जाहीर प्रचारात उत्तरणार नाही असे सांगितले.
यावेळी बैठकीला माजी आमदार मनीष जैन, महानगराध्य अभिषेक पाटील, महिला अध्यक्षा कल्पना पाटील, मीनल पाटील, नदीम मलिक, भूषण भदाणे, रवींद्र नाना पाटील, अरविंद मानकरी, ज्ञानेश्वर महाजन, ईश्वर पाटील, मोनिका पवार, अभिलाषा रोकडे, निशांत चौधरी, फैजाण पटेल यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.