जळगाव (प्रतिनिधी) उसोलार प्लँटच्या कामासाठी जमिनीचे सपाटीकरण व झाडेझुडपे काढून देण्याचे काम मिळवून देतो. याचे अमिष दाखवून आनंदा दगडू सपकाळे (वय ३९, रा. कानळदा, ता. जळगाव) यांची २ लाख ५ हजार रुपयात गंडविले. ही घटना एप्रिल २०२५ ते दि. ११ ऑगस्ट दरम्यान घडली. या प्रकरणी हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्र कंपनीचा सव्र्व्हेअर सोपान पोखरकर याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथील आनंदा सपकाळे यांचा जेसीबीद्वारे कामे करण्याचा व्यवसाय आहे. कानळदा येथे मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सोलार प्लँटचे काम सुरू असून तेथे सपकाळे यांनी झाडेझुडपे काढण्याचे काम घेतलेले आहे. या ठिकाणी त्यांची सोपान पोखरकर या कंपनीच्या सर्व्हेअरशी ओळख झाली. त्याने सपकाळे यांचा विश्वास संपादन करीत कंपनीकडून एक कोटी २९ लाख रुपयांचे मोठे काम मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी त्यांना कुसुंबा येथे घेऊन गेला आणि तेथे जागा दाखविली. या प्रकरणी आनंदा सपकाळे यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव फिर्याद दिली. त्यावरून सोपान पोखरकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विजय पाटील करीत आहेत.
खात्यावर ऑनलाईन पाठवले पैसे
काम मिळवून देण्यासाठी सुरुवातीला १ लाख व काम मिळाल्यानंतर २ लाख रुपये असे एकूण ३ लाख रुपये कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार सपकाळे यांनी ९ जून रोजी पोखरकर याच्या खात्यावर १ लाख रुपये पाठविले.
साहेबांच्या आईचे निधन झाले म्हणत उकळले पैसे
पैसे दिल्यानंतर पोखरकर याने ‘साहेबांच्या आईचे निधन झाले असून कामासाठी वेळ लागेल’ असे सांगितले. काही दिवसांनी अगोदरच द्यावे लागतील, असे सांगितल्याने सपकाळे यांनी पुन्हा १ लाख ५ हजार रुपये पाठविले.
पैसे देण्यास नकार दिल्याने दिली आत्महत्येचे धमकी
पोखरकर याने मुलगा आजारी असल्याचे सांगत पुन्हा १० हजार रुपये मागितले. मात्र सपकाळे यांनी अगोदरचे पैसे बुडाले असे समज व तुझ्याकडून जे होईल ते करून घे, तुझी गावात बदनामी करेल अशी धमकी दिली. तसेच तक्रार दिली तर माझ्या जिवाचे काही करून घेईल व तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून तुझा अडकवून टाकेल, अशीही धमकी दिली.