न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ११ सप्टेंबर रोजी २० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने अमेरिकन गुप्तचर संघटनेनं आजवर कुणी कधीही न पाहिलेले फोटो शेअर केली आहेत.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ३ हजार जणांचा मृत्यू झाला तर २५ हजार जण जखमी झाले होते. अमेरिकेत झालेला हा हल्ला लाखो लोकांनी पाहिला. तसंच त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजवर समोर आले आहेत. या दुर्मिळ फोटोमधून हल्ल्याचं नव रुप समोर आलं आहे. ११ सप्टेंबरला सकाळी १० च्या सुमारास फ्लाईट ११ हे विमान नॉर्थ टॉवरला तर त्यानंतर काही वेळातच आणखी एक प्रवासी विमान फ्लाईट १७५ साऊथ टॉवरला धडकले होते.
द सिक्रेट सर्विसनं नुकतच एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी ११ सप्टेंबरला या हल्ल्याला २० वर्ष झाल्याच्या निमित्तानं आजवर कधीही न पाहिलेले काही फोटो शेअर करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये काही पोलीस ढिगाऱ्या धुळीमध्ये माखलेले दिसत आहेत. तर एका फोटोत ग्राऊंड झिरोवरील ढिगारा आणि आकाशातील राख दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हे फोटो शेअर केले आहेत.















