
जळगाव प्रतिनिधी : खिडकीसाठी मोकळ्या असलेल्या जागेतुन चोरट्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर त्याने २० हजार ६५० रुपये किमतीचे तांबे-पीतळी भांडे घेऊन भामटा फरार झाला. गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना भवानीपेठेतील भांडे विक्रीच्या दुकानात घडली. या प्रकरणी गुरुवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विनोदराज रामनारायण मणियार (वय ७५, रा. चैतन्यनगर, गणेश कॉलनी) यांचे भवानीपेठेत भांडे विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी या दुकानाला लक्ष्य करत २० हजार ६५० रुपये किमतीचे भांडी चोरुन नेले. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार अझहर मिर्झा हे करीत आहेत.
















