भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील चोरवड गावातून चोरट्यांनी घराबाहेर लांबवलेली 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश सीताराम भंवर (63, चोरवड) यांच्या फिर्यादीनुसार, चोरवड गावातील घरासमोर त्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 बी.एन.9119) लावली असता चोरट्यांनी 4 ते 5 डिसेंबरदरम्यान संधी साधून दुचाकी लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने भुसावळ तालुका पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. तपास हवालदार संदीप बडगे करीत आहेत.