जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांच्यासह चौघांच्या नावाने आरएमएस कॉलनीतील महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार १० ऑक्टोबर रोजी रात्री घडला आहे. याप्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरएमएस कॉलनीतील रहिवासी रेखा सुभाष पाटील या त्यांच्या घराजवळ असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास तीन ते चार जणांनी काही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. या वेळी अज्ञात आरोपींनी रवी देशमुख, विनोद देशमुख, जगदीश पाटील व राजेश पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला. तसेच देशमुख यांच्यासह चौघांनी तुम्हाला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगत त्यांना सरेंडर होण्याचे सांगत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात रेखा पाटील यांनी रामानंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.