जळगाव (प्रतिनिधी) रिक्षात बसलेल्या खालीद रसूल बागवान (वय ५६, रा. बागवानवाडा) यांच्या खिशातून तीन जणांनी ७ हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. ४ रोजी दुपारच्या सुमारास हातोळा बाजार ते रुख्माई टेन्ट हाऊस दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बागवान वाड्यात खालीद रसूल बागवान हे वास्तव्यास आहे. दि. ४ रोजी दुपारी ते हातोळा मटनमार्केट परिसरातून रिक्षात बसले. त्यापुर्वी रिक्षात तीन अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसलेले होते. रिक्षा रुख्माई टेन्ट हाऊस जवळ येईपर्यंत त्या तिघांनी बागवान यांच्या खिशातून ७ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार रिक्षातून उतरल्यानंतर बागवान यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.
















