चोपडा (प्रतिनिधी) येथील बसस्थानकाजवळील टपरीजवळ शहर पोलिसांनी ६४ हजार किंमतीचा १२ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त करत तीन संशयितांना अटक केली आहे.
२३ रोजी रात्री कारवाई करत, शहर पोलिसांनी ६४ हजार किंमतीचा १२ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच विक्की झंवर, जितेंद्र महाजन, मनवेल म्हस्के या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार २३ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास विक्की झंवर (वय २८, रा. गुजरवाडा, भोकर, ता.जळगाव) याच्याकडे गांजा होता. तो त्याने मनवेल मार्टीन म्हस्के (वय ३३, रा. उल्हासनगर) व जितेंद्र रविंद्र महाजन (वय ३०, रा. उल्हासनगर) यांना विकला. त्याचवेळी चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासी सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहेत.