मेष : सामाजिक कार्यात गुंतलेल्या लोकांना सन्मान मिलेल. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. मनोबल कमी राहील. आज महत्त्वाची कामे नकोत. काहींना विनाकारण एखादी चिंता सतावणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. आज काही नवीन नातेसंबंध जोडाल ज्यामुळे फायदा होईल. वादविवादात सहभाग टाळावा. अकारण एखादा मनस्ताप संभवतो.
वृषभ : व्यापारी लोकांना अधिक मेहनत करावी लागेल. तरच तुम्हाला यश मिळेल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आरोग्य उत्तम राहील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आज व्यवसायात काही नवीन योजनांवर लक्ष द्याल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. व्यवसायासाठी काही नवीन योजनांवर लक्ष केंद्रित कराल. अकारण कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये. मन शांत ठेवावे. आपली विनाकारण चिडचिड होणार आहे. आज जास्त लाभ मिळणार नाही त्यामुळे निराशा पदरी पडेल. प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना अनपेक्षितपणे कोणतातरी दंड भरावा लागेल.
कर्क : कोणत्याही विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. भविष्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काही नवीन मित्र बनतील. आई-वडिलांची सेवा कराल. काहींचे नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. विविध लाभ होतील.
सिंह : व्यवसायात कोणताही करार न झाल्याने निराश व्हाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात करार करण्यापूर्वी विचार कराल. मनोबल उत्तम राहील. तुमच्या कामामध्ये तुमची प्रगती होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. पैसे परत मिळणे कठीण होईल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टींनी अनुकूल आहे. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे.
कन्या : कुटुंबात तणाव निर्माण होईल. ज्यामुळे चिंतेत असाल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमची जिद्द वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज घरात शुभ कार्य घडतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल.
तुळ : मुलांना परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर प्रवेश मिळेल. तुम्हाला जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक कामे विनासायास पूर्ण होतील. व्यावसायिकांना आजचा दिवस विशेष लाभाचा ठरेल. जुनी येणी वसूल होतील. आज संपत्ती संबंधित वादात तुमचा विजय होईल. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.
वृश्चिक : कोणत्याही सरकारी संस्थेकडून लाभ मिळतील. कुटुंबात तणाव राहिल. वरिष्ठांचा सल्ला घ्या. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहेत. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आज अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव पडणार आहे. वैचारिक प्रगती होईल.
धनु : मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील. सामाजिक कार्यात सक्रीयपणे सहभाग घ्याल. मानसिक अस्वस्थता असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात रस वाटणार नाही. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. खर्च वाढणार आहेत. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मनोबल कमी असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
मकर : आर्थिक फायदा होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण चिंताजनक राहिल, वाद घालू नका. आरोग्याची काळजी घ्या. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मनोबल चांगले असणार आहे. आज व्यवसायात नवीन डील फायनल कराल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : व्यवसायात थोडा फायदा झाला तरी मन प्रसन्न राहिल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न कराल. आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आज तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुमच्या कामाची गती विशेष असणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.
मीन : शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करेल. सावध राहावे लागेल. पैसे उधार दिल्यास पुन्हा मिळणार नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. तुमची अपेक्षित प्रगती तुम्ही साध्य करणार आहात. काहींना गुरुकृपा लाभेल. मुलांच्या समस्या सोडवला. त्यांना स्पर्धेत यश मिळेल. एखाद्या तीर्थक्षेत्री भेट देणार आहात. प्रवास सुखकर होतील.