टोकयो (वृत्तसंस्था) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे तिच्या पदक जिंकण्याच्या आशा आणखी पल्ल्वीत झाल्या आहेत. ग्रुप J मध्ये सिंधूने महिला एकेरीमध्ये इस्रायलच्या खेळाडूला मात दिली. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त २८ मिनिटांत पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली.
सिंधूने सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी केस्नीया पोलिकारपोवा हिच्यावर दबाव ठेवून होती. तिने सुरुवातीला काही पॉईंट्स नावे केले, ज्यानंतर केस्नीयाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच न देता सामना जिंकला. सिंधू अगदी तुफान फॉर्ममध्ये दिसून येत होती. विशेष म्हणजे हा सामना अर्धा तासही चालला नाही. सिंधूने अवघ्या २८ मिनिटांत सामना जिंकला.
दोन्ही गेम्स सहज जिंकत सिंधूने आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये का गणले जात आहोत याची चुणूक दाखवून दिली. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग १२ पॉइंट्स मिळवत १७-५ अशी आघाडी घेतली होती. पहिला गेम २१-७ ने जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने वर्चस्व कायम ठेवत २१-१० ने विजयाची नोंद केली आणि २९ मिनिटांत सामना पूर्ण केला. आता बुधवारी पी व्ही सिंधू हाँगकाँगच्या खेळाडूचा सामना करणार आहे.
स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अप्रतिम विजय मिळवत २६ वर्षीय सिंधूने भारताला यंदाही २०१६ प्रमाणे पदक जिंकवण्याच्या शक्यतांना अधिक दाट केलं आहे. स्पर्धेत एक चांगली सुरुवात झाल्याने सिंधू आता आत्मविश्वासाने खेळेल ज्यामुळे ती यंदा पदक नक्कीच खिशात घालेल अशी आशा सर्वच व्यक्त करत आहेत.