जळगाव (प्रतिनिधी) येथील ईकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे वृक्षरोपणचा कार्यक्रम घेण्यात आला.
ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार, डॉक्टर इकबाल शाह, प्रभारी प्राचार्य इब्राहिम पिंजारी यांच्या शुभ हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. राजू गवरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. तनवीर खान, महिला कार्यक्रम अधिकारी शबाना खाटिक, डॉ. हफिज शेख यांनी परिश्रम घेतले. तसेच डॉ. युसुफ पटेल, डॉ. चांद खान, डॉ. वकार शेख , डॉ. अमीन काझी, प्रा. रेखा देवकर, प्रा. डॉ.अंजली कुलकर्णी, डॉ.आएशा बासीत, डॉ. फिरदोस शेख यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी शेख मोहंमद माजूल हक, फैजान शाह यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.















