अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील अडावद उनपदेव रस्त्यावर भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिली. यावेळी अमोल संजय महाजन (वय १८) या युवकाचा जागीच मृत्यु झाला.
दि. १५ रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास उनपदेव रस्त्यावर शेताकडून अडावदकडे दुचाकीस्वार येत असताना प्रमिला नगर जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार अमोल संजय महाजन (वय १८) हा जागीच ठार झाला. या तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी पवन सुशीर यांनी त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हवालदार भरत नाईक, शुभम बाविस्कर यांनी भेट दिली तात्काळ ते अज्ञात चारचाकी वाहनाच्या शोधासाठी गेले.