वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरात टीका केली जात आहे.
अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की, त्यांनी आपली शपथ पूर्ण करुन संविधानाचं संरक्षण करावं आणि हा वेढा संपवण्याची मागणी करावी. कॅपिटल बिल्डिंगवर झालेला गोंधळ हा देशद्रोह असल्याचं जो बायडन म्हणाले. “मी स्पष्ट करतो की, कॅपिटल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न पाळणाऱ्यांचीही संख्या आहे, असं बायडन म्हणाले.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये डोनाल्ड ट्रंप समर्थकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. विलमिन्गटनमध्ये बोलताना जो बायडेन म्हणाले, ‘लोकशाही अप्रत्यक्षरित्या धोक्यात सापडली आहे. मी राष्ट्रपती ट्रंप यांना अपील करतो, त्यांनी टीव्हीवर जाऊन आपल्या शपथेचं पालन करत लोकशाहीचं रक्षण केली पाहिजे. कॅपिटलमध्ये जबरदस्तीने घुसून खिडक्या तोडणं, प्लोअरवर येणं आणि गोंधळ करणं याला विरोध नाही हिंसाचार म्हणतात.’ अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही राजकीय तणाव सुरु आहे. निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.