छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) कौटुंबिक कलहातून पत्नी आणि पोटच्या मुलांना वडापावमध्ये विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. पत्नी व मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारदार महिलेचे आणि तिचे पतीचे कौटुंबिक कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच तक्रारदार महिलेचा पती शेख इसाक याने आपले नातेवाईक शेख शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख शेख याकूब, फुरखान (सर्व रा क्रांतीचौक परिसर) यांच्या मदतीने आणि संगणमत करून १६ ऑगस्टच्या रात्री वडापावमध्ये विष कालवून पत्नी आणि मुलांना खाण्यासाठी दिले होते. वडापावचा वास येत असल्याचे निदर्शनास आल्यावर तक्रारदार महिलेने आणि तिच्या मुलांनी वडापाव न खाता फेकून दिले. त्यानंतर त्यात काही तरी मिसळले असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पती शेख इसाक, नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान यांच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार राठोड हे करीत आहेत.