गडचिरोली (वृत्तसंस्था) तेलंगणातील कालेश्वरममध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या सिरोंचा तालुक्यातील दोघांचा कालेश्वरम येथे गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. सुरेश गोपाल चिलमुला (४५, रा. सिरोंचा माल, ता. सिरोंचा) व कोनम रामेश्वर (३०, रा. रंगधामपेठा, ता. सिरोंचा) अशी मयतांची नावे आहेत.
दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. ते दोघे १५ ऑक्टोबरला तेलंगणातील कालेश्वरमच्या गोदावरी त्रिवेणी संगमावर बुडाले. बुडाल्यानंतर दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतू ते सापडले नाहीत. १६ रोजी दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर ते नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. अधिक तपास महादेवपूर पोलिस करत आहेत.