जळगाव (प्रतिनिधी) दोघा दुचाकीस्वार तरुणांनी पादचा-याचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना काल दुपारी एमआयडीसी हद्दीत घडली होती. याप्रकरणी योगेश जयसिंग चव्हाण आणि विजय बाळू भालेराव या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी भुषण पाटील यांच्याकडून शुक्रवारी अज्ञात चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेला होता. गुन्हा दाखल करतांना त्यांनी केवळ दोघा दुचाकीस्वारांचे वर्णन नमुद केले होते. त्यानुसार पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ.सुधीर साळवे, आसीम तडवी व चेतन सोनवणे यांनी संशयीत आरोपी योगेश जयसिंग चव्हाण (वय-२२, रा. पंचमुखी हनुमान मंदीराजवळ) आणि विजय बाळू भालेराव (वय-२२ सुप्रीम कॉलनी प्रेमाबाई शाळेजवळ) या दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक अमोल मोरे व त्यांचे सहकारी रतीलाल पवार करत आहेत.