धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. ५३ वर पारस पेट्रोल पंपासमोरील रोडवर भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालक भटू मोतीलाल महाले (रा. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कल्पेश सुधाकर शिंदे (वय २६, रा. पोखरी ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३१ मार्च २०२२ रोजी धरणगाव तालुक्यातील पाळधी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. ५३ वर पारस पेट्रोल पंपासमोरील रोडवर ट्रक क्रमांक एम.एच.१८/बी.ए. ०१८८ ही भरधाव वेगात रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवुन यातील फिर्यादीचे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.१९/सी.व्ही.६६०४ व ट्राली क्र.एम.एच.१९/ए.एन.७६२५ हिस मागुनठोस मारल्याने ट्रालीचे मागील फालक्यासह चेसिसतुटुन नुकसान झाले. ट्रालीतील कांदे रोडवर फेकले गेल्याने नुकसान होवुन फिर्यादी व साक्षीदार याला दुखापत झाली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालक भटू मोतीलाल महाले (रा. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पो.हे.कॉ विजय चौधरी करीत आहेत.