धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खुर्द येथुन जवळच असलेल्या भोद खुर्द चौफुलीवर आज दुपारच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव जिल्ह्यात रस्ता नाविनिकरण झाले असून रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांच्या वेगात देखील वाढ झाली आहे. मागील दोन आठवड्यापूर्वी चिंचपुरा येथे दोन म्हशींना उडवल्याची घटना झाली होती. आज ३ फेब्रुवारी रोजी भोद खुर्द चौफुलीवर दोन दुचाकीवरून जाणाऱ्या गाड्यांचा अपघात झाला. त्यात दुचाकी वरून जाणारे प्रवासी जखमी झाले. प्राथमिक उपचारसाठी त्यांना पिंप्री येथे दाखल करण्यात आले. यासंदर्भात मात्र पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे कळते.
















