धरणगाव (प्रतिनिधी) अमळनेर रोडवरील भोणे गावाजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात धरणगावचा एक जण जागीच ठार झाला आहे. सुरेश भिकाजी सोनवणे (वय.४९ रा.पारधीवाडा) असे मयताचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुरेश सोनवणे हे कामानिमित्त आपल्या दुचाकीने भोणे गावाच्या दिशेने जात होते. याचवेळी भोणे गावाजवळील पांडुरंग सातपुते यांच्या शेताजवळ अचानक समोरून येणाऱ्या क्रेटा या कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात सुरेश सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सुरेश सोनवणे हे गांधी बालविद्या मंदिर कोहिनूर सिटी कुर्ला (मुंबई) येथे कला शिक्षक असल्याचे कळते. होते. १३ दिवसांपूर्वी आईचे निधन झाल्यापासून ते धरणगावात आलेले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, वडील, भाऊ असा परिवार आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उमेश पाटील हे करीत आहेत.