धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगांव बु येथून अज्ञात चोरट्याने हिरो कंपनीची एचएफ डिलक्स दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चत्रभुत सुभाष गव्हाणे (बोरगांव बु// ता. धरणगाव जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ११.३० वाजता ते दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या सकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मो.सा.क्र. १९ CK ४२९० चोरून नेलीय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ संतोष थोरात हे करीत आहेत.
















