मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनानंतर अर्थव्यवस्था पूर्ववत होत असल्याने बेरोजगारीचा दर घटत असल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) यासंबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीची (Unemployment) टक्केवारी ही 8.10 होती, तर मार्च महिन्यात हिच आकडेवारी घटल्याने 7.6 टक्के झाली आहे. 2 एप्रिल रोजी ही टक्केवारी घटल्याने 7.5 टक्केवारीवर आली आहे.
अर्थव्यवस्था पूर्वपदावर
देशातील अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते, बेरोजगारीचाही दर कमी होत आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) यांच्याकडून ही आकडेवारी सांगण्यात आली आहे. त्यांच्या मतानुसार बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात 8.10 टक्के होता तर मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर घटून 7.6 झाला आहे.
हरियाणा सरकारने सांगितले की, भारतासारख्या गरीब देशातील ही बेरोजगारीची टक्केवारी कमी झाली असली तरी, त्या भारताच्या दृष्टीने गंभीर आहे. तर ग्रामीण भागातील तरुण ही बेरोजगारी सहन करु शकणार नाहीत. त्यामुळेच सध्या ग्रामीण भागातील तरुणांचे खाण्यापिण्याचे प्रश्न मिठला की तो कोणतेही काम करण्यास तयार होत आहे.
सर्वाधिक आकडेवारी हरियाणात
बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात बेरोजगारीची आकडेवारी हरियाणामध्ये 26.7 टक्के होती. तर त्यानंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये 25-25 टक्के होती. बिहारमध्ये बेरोजगारीचा दर हा 14.4, त्रिपुरामध्ये 14.1 पश्चिम बंगाल 5.6 टक्के राहिला आहे. तर एप्रिल 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 7.97 टक्के होता. मागील वर्षी मे महिन्यात हा दर 11.84 टक्क्यांवर पोहचला होता. तर मार्च 2022 मध्ये कर्नाटक आणि गुजरातमध्ये बेरोजगारीचा हा दर 1.8-1.8 टक्के एवढाच होता.