अहमदनगर (वृत्तसंस्था) श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चैतन्य अनिल माळी (वय १२), दत्ता अनिल माळी (वय ८) व चैतन्य शाम बर्डे (वय ४) अशी त्यांची नावे आहेत.
नुकत्याच झालेल्या पावसाने शेततळ्यात पाणी साचलेले आहे. खेळत असताना मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिन्ही मुले बुडाली असल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ जमा झाले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पाण्यातून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही तिन्ही मुले गरीब कुटुंबातील आहेत. दोघे सख्ये भाऊ तर तिसरा जवळचा नातेवाईक असून ते सर्व जण एकत्रच राहत होते.