धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील टिळक तलाव परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविल्या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, गौरव राजेंद्र लोहार (वय ३०, रा. टिळक तलाव, धरणगाव)यांच्या घराच्या अंगणात लावलेली २५ हजार रुपये किंमतीची बजाज प्लाटीना कंपनीची मोटार सायकल क्रमांक (एमच-१९ डीडब्ल्यू. ७४३९) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. फौजदार योगेश जोशी हे करीत आहेत.
















