धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव संचालित नोकरांची पतपेढीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्ष प्रा.बी.एल. खोंडे, उपाध्यक्ष प्रा.एस.बी. शिंगाने यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टी.एस. बिराजदार, उपप्राचार्य प्रा डॉ.के.एम. पाटील, उपप्राचार्य प्रा.आर.आर. पाटील, ग्रंथपाल प्रा.पी.आर. देशमुख तसेच कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधु यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक आदरणीय अजय शेठ पगारिया, यांनी ही अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.