औरंगाबाद (वृत्तसंस्था) पत्नी आणि पत्नी यांच्यात क्षुल्लक कारणावरून कुरबूर होते ही सामान्य बाब आहे. मात्र अनेक ठिकाणी ही कुरबूर घटस्फोटापर्यंत जाते. काही घटनांमध्ये पती-पत्नीतील वाद जीवघेणे ठरतात. अशीच एक घटना औरंगाबादमधून समोर आली असून पतीचा पत्नीसोबत झालेल्या वाद विकोपाला गेला आणि पतीने आपल्या पत्नी समोर धारदार शस्त्राने स्वत:चाच गळा चिरला. या घटनेमुळे औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जखमी पतीचे नाव भाऊसाहेब काकडे तर पत्नीचे राणी काकडे असे आहे. ३३ वर्षीय भाऊसाहेब काकडे यांचा काही दिवासांपूर्वी २२ वर्षीय राणी यांच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीचे सहा महिने त्यांच्या संसार सुखात चालला. नंतर मात्र, छोट्या-छोट्या कारणांवरुन त्यांच्यात सारखे वाद होत होते. नेहमीच वाद होत असल्यामुळे भाऊसाहेब काकडे मानसिक तणावातून जात होते. शेवटी वादाला कंटाळून भाऊसाहेब आणि राणी या दाम्पत्याने घटस्फोट घेण्याचे ठरवले. नियोजित वेळेनुसार सोमवारी दोघांनीही घटनस्फोट घेतला. मात्र, रितसर घटस्फोट झाल्यानंतरही यांच्यातील वाद कमी झाला नाही. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरच या दोघांमध्ये वाद सुरु झाला. शेवटी मध्यरात्री बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भाऊसाहेब यांनी एका धारदार शस्त्राने स्वत:चा गळा चिरून घेतला. या घटनेत काकडे गंभीर जखमी झाले आहेत. काकडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सोमवारपासून उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.