धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक ८ व ९ मध्ये आज शिवसेनेतर्फे आयोजित कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी झालीय. रामदेवबाबा मंदिर तसेच नेहरू नगरमधील लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
लसीकरण शिबिराचे उद्घाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, प्रभागाचे नगरसेवक कीर्ती किरण मराठे, मंदा धनगर राजेंद्र ठाकरे संजय चौधरी, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक भागवत चौधरी, वासुदेव चौधरी, विजय महाजन जितेंद्र धनगर हे होते. यावेळी करण वाघरे, पापा वाघरे, तौसिफ पटेल, रामीज पटेल, तुषार धनगर, भीमराव धनगर, रवींद्र जाधव, वाल्मिक पाटील, पुडलीक पाटील, भैय्या भालेराव, राजू चौधरी अरविंद चौधरी, गोलू चौधरी, विनोद रोकडे, बुरा धनगर, दिनू धनगर, गोपाळ धमोळे, सुनील लोहार, प्रवीण धमोळे, लकी भाटिया, कल्पेश चौरे, डाक्टर, आरोग्य डॉ. मयुर जैन, नर्स सरोज भदाणे, पुनीत थोरात, भुषण पालेवाल तर रामदेवबाबा मंदिर जवळ सिस्टर आर एस सोनवणे, ऑफरेटर उमेश येवले, तर साह्ययक म्हणून कल्पेश चौरे, सागर पाचेरवार, नितेश सुरती, सारंग वाघरे, रोशन वाघरे, मनोहर पटोले, पूनम वाघरे, सुमित वाघरे सर्व नगरसेवक व परिसरातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
















