धरणगाव (प्रतिनिधी) ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीतून कार्यक्रम राबवत असताना आज मोठा माळीवाडा परिसर आणि मोरवाडी परिसरात लसीकरणाचा कार्यक्रम धरणगाव शिवसेनेतर्फे राबवण्यात आला. यावेळी परिसरातील असंख्य नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
याप्रसंगी मोठा माळीवाडा परिसरात माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, यांनी फित कापून उद्घाटन केले. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्वतः लसीकरणाचा लाभ घेतला आणि जनतेलाही आव्हान केले. यावेळी उपस्थितांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखाताई महाजन, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, विजय महाजन, युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन, तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे, राहुल रोकडे, लोकमतचे लक्ष्मण महाजन, महेंद्र महाजन तसेच त्या परिसरातील सर्व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.
तसेच मोरवाडी परिसरात सुद्धा प्रभाग क्र.७चे नगरसेवक वासुदेव चौधरी आणि नगरसेविका अनुराधा पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मोरवाडी येथे शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याठिकाणी सुद्धा नागरिकांचा लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते अरविंद चौधरी, विनोद रोकडे, गोलु चौधरी, कमलेश बोरसे, रवी जाधव, छोटू भाऊ जाधव, बुलंद पोलीस टाइम्सचे योगेश पी.पाटील, नंदु पाटील यांनी मेहनत घेतली.
तसेच माळीवाडा परिसरात सोनार सिस्टर, मोरावकर सिस्टर, ज्योती पाटील, ऑपरेटर दिनेश बडगुजर, महेश चौधरी यांनी काम पाहिले तर मोरवाडी परिसरात सरोज भदाणे, मीरा महाजन, ऑपरेटर आर के देशमुख, पुनीत थोरात यांनी काम पाहिले.