TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीयांवर अन्याय करून परदेशात लस निर्यात केल्या नाहीत : अदर पुनावाला

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) संपूर्ण भारत देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सापडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून देशात दररोज ४ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होतोय. तसेच देशात व्यापक प्रमाणावर लसीकरण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ, अदर पुनावाला यांनी भारतीयांवर अन्याय करून कोरोना प्रतिबंधक लस परदेशात निर्यात केलेली नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

भारतीयांवर अन्याय करून कोरोना प्रतिबंधक लस परदेशात निर्यात केलेली नाही. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होण्यास किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे, असे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले असून लस निर्यातीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा अनाठायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सीरम इन्स्टिटय़ूटतर्फे मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून पूनावाला यांनी करोना लसीचे उत्पादन, निर्यात आणि भारतातील लसीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चाबाबत भाष्य केले आहे. जगातील सर्व देशांबरोबरच भारतातही कोरोना संकट गंभीर आहे. जानेवारी २०२१ मध्ये सीरमकडे लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होता. त्या बळावर देशातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्याच दरम्यान देशात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे देशातील साथ आटोक्यात आल्याचा समज आरोग्य तज्ज्ञांसह सर्वानी करून घेतला होता. मात्र, जगातील काही देशांमध्ये त्यावेळी कोरोना महासाथीचे संकट अत्यंत गंभीर होते. संकटकाळात परस्परांना मदत करण्याचे देशाचे धोरण आहे. त्याचा उपयोग वेळोवेळी इतर देशांना तसेच भारतालाही झाला आहे, असे पूनावाला यांनी म्हटले आहे.

या धोरणाचा भाग म्हणून कोव्हॅक्स गटातील देशांना लस पुरवठा करणे अनिवार्य आहे. कोरोना महासाथ हे जागतिक संकट असल्याने सर्व देश सुरक्षित होईपर्यंत भारत सुरक्षित असणे शक्य नाही. मात्र, भारताची लोकसंख्या लक्षात घेता लसीकरण मोहीम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणे शक्य नाही. किमान दोन ते तीन वर्षे ते चालणार हे स्पष्ट आहे. अमेरिकेनंतर तब्बल दोन महिन्यांनी भारतात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराची परवानगी आम्हाला मिळाली. तरीही लशींच्या २० कोटी मात्रा आम्ही प्राधान्याने भारताला दिल्या आहेत. भविष्यातही उत्पादनाचा वेग वाढवण्याबरोबरच लस पुरवठय़ाबाबत भारतालाच प्राधान्य असेल असे स्पष्टीकरणही पूनावाला यांच्याकडून देण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

मॉर्निंग वॉक व व्यायाम घरीच करून प्रशासनाला सहकार्य करा : फारूक शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे आयोजित योगासन शिबिरात मिळाला निरोगी जीवनाचा मंत्र

June 20, 2021

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लगेच होतील ? ; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल !

April 8, 2022

तरुणाला मारहाण करून घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा ; अॅड.संजयभाऊ महाजन यांची मागणी !

May 31, 2023

वटपौर्णिमेनिमित्त पुजेसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातून चार तोळ्याची पोत लंपास !

June 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group