धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते हेमंत काशीनाथ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना तसेच प्रसूती वार्डातील माता भगिनींना फळे वाटप करण्यात आले.
शहरातील प्रसिद्ध श्रीकृष्ण गोशाळेत गाई व वासरांना हिरवा चारा देत हेमंत महाजन यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भावनिक स्वभावाचा प्रत्यय दिला. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जळगाव लोकसभा सह. संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, विलास महाजन, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, धिरेंद्र पुरभे, विजय महाजन, कृपाराम महाजन, भैय्याभाऊ महाजन, वाल्मिक पाटील, हेमंत महाजन, रवी महाजन, विजय महाजन, अनिल महाजन, मयूर मोरवकर, विकास मोरवकर, जयेश महाजन, अमोल चौधरी, सद्दाम अली, संतोष महाजन, भूषण महाजन, मंगेश महाजन, संजय महाजन, मोनू महाजन, पंकज महाजन व इतर कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.