पारोळा (प्रतिनिधी) येथील भाजीपाला विक्रेत्याच्या अंगावर विद्युत तार पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. १९ रोजी संध्याकाळी ७:३० ते ८ वाजेच्या सुमारास घडली. परमेश्वर संतोष महाजन (वय ४२, रा. पेंढारपूर, ता. पारोळा) असे भाजी विक्रेत्याचे नाव आहे.
सायंकाळी हातगाडीवर काम करत असताना वीज तार महाजन यांच्या अंगावर पडली. त्यामुळे बाजारात पळापळ झाली. काहींनी काठीने ही तार दूर केली, त्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात करण्यात आला. महाजन यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.