मुंबई (वृत्तसंस्था) माजी खासदार व भाजपचे नेते किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप करतायत. मात्र, आता सोमय्या यांनी मुंबईचे सह-पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला आहे.
घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावे लागते. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात त्यांच्यावर मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईबाबत बोलाताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावं. विश्वास नांगरे पाटलांनी मला तर बेकायदेशीर रित्या मला घरात कोंडून ठेवलं. तेच सूचना देत होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कोल्हापूरला जाताना ज्या पद्धतीने मला रोखले त्याविरोधात किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे.
















