TheClearNews.Com
Monday, November 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“व्हिजन, मिशन अँड अँबिशन – चाळीसगाव@52”

वाचा : आमदार मंगेशदादा चव्हाण अभिष्टचिंतन विशेष लेख !

vijay waghmare by vijay waghmare
August 22, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : चार पिढ्यांचा राजकारणाशी सुताराम संबंध नाही…आई – वडिल जमिनीच्या एका चतकोर तुकड्यात राबराब राबणारे…संसाराचा गाडा ओढण्यासाठी वडिलांनी ग्रामपंचायतीत ‘पिण्याचे पाणी सोडणारा…’ असं काम पत्करलेलं. ही स्वप्नवत वाटावी परंतू सत्यवत गोष्ट आहे… चाळीसगाव विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय युवा आमदार मंगेशदादा चव्हाण यांची..!

प्रसिद्धी वलय असले तरी मंगेशदादांचे पाय जमिनीवरच आहेत. ते स्वतःला जनतेचा सेवक आणि भाजपाचा निस्सीम पाईक मानतात. त्यांच्या याच साधेपणाने आणि निखळ सच्चेपणाने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही दबदबा निर्माण केला आहे. जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली आक्रमक व निर्णायक भूमिका, मिळालेला ऐतिहासिक विजय आणि दुध संघाचे सर्वात कमी वयाचे चेअरमन होण्याचा मिळालेला मान हा सर्व प्रवास कोणत्याही राजकीय विश्लेषकाला अचंबित करेल असाच आहे. देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांना ते आपले आदर्श मानतात. महाराष्ट्राचे धुरंधर नेतृत्व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रभाऊ फडणवीस, खान्देशाचे नेते, संकटमोचक मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली मंगेशदादांनी चाळीसगाव तालुक्याच्या शाश्वत विकासाचा संकल्प केला आहे.

READ ALSO

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

कन्नडच्या महिलेची ९० हजारांची सोनपोत लंपास

२०१९ची विधानसभेची निवडणुक तालुक्याच्या राजकारणाची समीकरण बदलवणारी ठरली. प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य घरातील मंगेशदादा असा सामना झाला. अर्थातच चाळीसगाववासियांनी मंगेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत सर्वसामान्य वारकरीपुत्राला विधानसभेत पाठविले. गेल्या चार वर्षात चाळीसगावातील समस्त जनता – जर्नादनाचा विश्वास सार्थ ठरवितांना आ. मंगेशदादांनी आपले किमयागार, निडर नेतृत्व सिद्ध केले आहे. मतदारसंघात विकास कामांसाठी निधीचा ओघ सुरु ठेवतांनाच स्वतः पदरझळ सोसून अनेकांना मदत केली. रंजल्या – गांजल्यांसह गोरगरिब व गरजू त्यांच्या दारातून कधी रिकाम्या हातांनी माघारी फिरला नाही. पुढे कधीही त्यात खंड पडणार नाही, असे त्यांचे दिलेर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या दातृत्वाची ओंजळ नेहमीच भरलेली असते. त्यांच्या आमदारपदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कोरोनाची लाट आली. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून अडीच वर्ष सापत्न वागणूक मिळाली. तथापि, आपल्या अजातशत्रु व्यक्तिमत्वामुळे याकाळातही त्यांनी धीरोदत्तपणे सकारात्मक काम केले… ते सतत जनतेत राहिले. त्यांच्या सुख – दुःखाचे वाटेकरी झाले.

आ. मंगेशदादा हे राज्यभर आंदोलन करणारे योद्धे म्हणून ओळखले जातात. शेतकरी, नागरिकांसाठी कुणालाही शिंगावर घ्यायची त्यांची तयारी असते. गुटख्याच्या गाडीचा पाठलाग असो वा चालकाचा वेष परिधान करुन कन्नड घाटात सुरु असलेली वसुली उघड करणे असो. शेतकरी संघातील भरडधान्य खरेदी घोटाळा, शेतक-यांसाठी महावितरण कंपनीविरोधात आंदोलन करतांना १२ दिवसांचा भोगावा लागलेला तुरुंगवास, आरटीओ मार्फत वाहनचालकांची लुटमार, भूमी अभिलेख कार्यालयातील गैरप्रकार…दुध संघातील भ्रष्टाचार… जिथे चुकीचा विषय असला तिथे भ्रष्ट प्रवृत्तीवर त्यांनी नेहमीच कडाडून हल्ला केला.मतदार संघाच्या व्यतिरीक्तही त्यांनी अनेक प्रश्नांची विधीमंडळाच्या पटलावर अभ्यासू उकल केली. स्पर्धा परीक्षा निवड झालेले उमदेवार, कोतवाल, ग्रामसेवक, संगणक परिचालक, पोलीस पाटील, विनानुदानित शिक्षक आदी विविध घटकांच्या समस्यांना आवाज दिला.

आमदार मंगेशदादांनी चाळीसगाव तालुक्यातील मुलभूत प्रश्न, समस्या सोडवितांना स्मार्ट विकासासोबतच स्वच्छ, सुंदर व हरित चाळीसगावचा कृती आराखडा तयार केला आहे. गेल्या चार वर्षात ते याच ध्यासातून मिशन मोडवर राहून काम करीत आहे. त्यांच्या इच्छाशक्तीला आता ट्रिपल इंजिन सरकारची गती मिळाली आहे. वरखेडे – लोंढे धरण कार्यान्वीत होण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. धरणामुळे विस्थापित होणा-या तामसवाडीच्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी सन्मानजनक जागा उपलब्ध करुन देतांना धरणाच्या बंदिस्त पाटचारीसाठी ६०० कोटी रुपये निधी मंजूर करुन आणत प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात देखील झाली आहे. सद्यस्थितीत विखुरलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभी राहत आहे. येत्या काळात ही इमारत चाळीसगावची नवी ओळख ठरावी. रोहिणी व परिसरातील १७ पाणीटंचाईग्रस्त गावांना थेट गिरणा धरणावरून पाणी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु झाले असून आता या भागातील माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या भगीरथ प्रयत्नांनी कायमचा दूर होणार आहे.

यासोबतच विस्तारित न्यायालय इमारत, उसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी २०० विद्यार्थी क्षमतेचे दोन वस्तीगृह, पंचायत समिती इमारत, नवीन प्रांत कार्यालय, तहसीलदार निवासस्थाने, नाट्य व कालाप्रेमींचे स्वप्न असणारें अत्याधुनिक नाट्यगृह, व्हीआयपी विश्रामगृह, वलठाण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारत व मुलींसाठी वस्तीगृह बांधकाम, ग्रामीण भागात शेकडो कोटींचे कोटींचे रस्ते व पूल, गावांतर्गत कॉक्रीटीकरण, शिवाररस्ते, पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात आणि पं.स.च्या प्रत्येक गणात त्यांनी विकासकामांची मुहूर्तमेढ केली आहे. ५६ तलाठी सज्जांना स्वतःच्या इमारती, मेहुणबारे येथे अप्पर तहसिलदार पदाला मंजूरी, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांना डिजिटल रुपडे देण्यासाठीही त्यांचे एक पाऊल पुढे आहे. शहरात देखील विविध विकासकामे सुरु केली असून शहरातील प्रमुख रस्त्यांचे कॉक्रीटीकरण, दुरुस्ती करण्यासह ठिकठिकाणी सोलर विज दिवे, आकर्षक पथदिवे लावल्याने सौंदर्य उजळून निघाले आहे. तालुक्यातील शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या गावी स्मृतीस्थळ व चौक सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करून आणला असून याव्दारे त्यांच्या प्रखर राष्ट्रभक्तिचे दर्शन होते.

आता चाळीसगावचं प्रत्येक पाऊल विकासाच्या वाटेवर पडत आहे…नवा इतिहास घडत आहे. चाळीसगावला कार्यरत झालेल्या नवीन एमएच ५२ आरटीओ कार्यालयाने याला लखलखणारे तोरण बांधले गेले आहे. महाराष्ट्रात एम.एच. ५० कराड नंतर गेल्या १३ वर्षात असे पहिलेच कार्यालय विशेष बाब म्हणून मंजुर झाले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे चाळीसगावची नवी ओळख आता महाराष्ट्रच नव्हे तर देश पातळीवरही होत आहे. एमएच ५२ हा केवळ एक क्रमांक नसून चाळीसगावातील साडेचार लाख लोकसंख्येची खणखणीत अस्मिता आहे. आमदार मंगेशदादांनी आपल्या समाजहितैषी व्यक्तिमत्वाने तिला नव्या उंचीवर विराजमान केले आहे. आरटीओ कार्यालयामुळे चाळीसगावच्या अर्थोन्नतीला बळकटी मिळणार असून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

वारकरी पुत्र असणाऱ्या मंगेशदादा चव्हाण यांनी गत ४ वर्षात २० हजार ज्येष्ठ नागरिकांना पंढरपुर वारीतून विठूरायाचे दर्शन घडविले. १० हजार युवकांना रायगडवारीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करुन देतांना त्यांच्यात सामाजिक काम प्रेरणा प्रज्वलित केली. मंगेशदादा व त्यांच्या सुविद्य पत्नी शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई दरवर्षी १५०० अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका भगिनींचे माहेरपण साजरे करतात. आजवर त्यांच्या ६७ मुलींच्या विवाह सोहळ्यात त्यांनी ‘मामाचा आहेर’ म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत केली आहे.

संकट कोणतही असू दे मंगेशदादांमधला संवेदनशील माणूस मदतीसाठी ‘मंगेशासारखा’ उभा राहतो. अवकाळी, पाऊस, वादळ, महापूर, अपघात, नैसर्गिक आपत्ती, आजारपण, दूर्धर आजार, शस्रक्रिया… मदतीसाठी त्यांचा सढळ हात पुढे असतो. दोन वर्षापूर्वी महापुरात सर्वस्व गमावलेल्या ५० कुटूंबांना त्यांनी स्वखर्चाने ‘मायेचं घर’ उभारुन दिले. पैसा सगळ्यांकडेच असतो. परंतू तो सर्वसामान्यांच्या सुख – दुःखासाठी खर्च करणे सगळ्यांना जमत नाही. त्यासाठी घेण्याचा नव्हे तर ‘देण्याचा’ संस्कार हा जन्मजातच असावा लागतो. मतदारसंघात टक्केवारी, कमिशनमुक्त कामांचा प्रघात त्यांनी सुरु केला. त्यांच्या अंत्योदय कार्यालयातूनही येणा-या प्रत्येक नागरिकाला दिलासा दिला जातो.

राजकीय, सामाजिक आदी सर्वच क्षेत्रात पुढे असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण शैक्षणिक मदतीच्या बाबतीत मागे राहतील असे होणार नाही, परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांची शिक्षणवारी अर्ध्यावर थांबू नये. यासाठी त्यांनी सहकार महर्षि रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात ४५० गरजू विद्यार्थ्यांना १५ लाखांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली तर विद्यार्थ्यांची शिक्षणाची चाके थांबू नये यासाठी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत सायकलींचे वाटप केले. चाळीसगाव मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांना विधानभवनाची स्वखर्चाने सहल घडवून आणत एक वेगळा आदर्श त्यांनी उभा केला आहे. अश्या विविधांगी विकासकामांमुळे व आपल्या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपली वेगळी ओळख राज्यात निर्माण केली आहे. मंगेशदादांसारखे लोकसमर्पित नेतृत्व लाभल्यानेच चाळीसगाव तालुक्याचा चौफेर विकास होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: "VisionChalisgaonMission and Ambition - Chalisgaon@52"

Related Posts

चाळीसगाव

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

November 1, 2025
गुन्हे

कन्नडच्या महिलेची ९० हजारांची सोनपोत लंपास

October 29, 2025
गुन्हे

कारमधील प्रवाशांवर दरोड ; १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटला

October 27, 2025
चाळीसगाव

लाडक्या बहिणींसमोर ई-केवायसीसाठी अडचणींचा डोंगर

October 20, 2025
गुन्हे

पोलीस असल्याचे नाटक… आणि वृद्धाची लूट !

October 4, 2025
जळगाव

खडसेंच्या विरोधाला संजय पवारांचा प्रत्युत्तराचा टोला !

October 2, 2025
Next Post

खाजगी व शासकीय शाळांनी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी : ॲड जमील देशपांडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू !

October 6, 2023

गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचा गराडा, फोटो व्हायरल; गृहमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

February 2, 2021

ठाणे मनपा अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा प्राणघातक हल्ला, दोन बोटे तुटली !

August 30, 2021

डॉ. नि.तु.पाटील यांनी 108 दिवसात माँ नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे केली पूर्ण !

July 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group