बोरगाव ता.धरणगाव (प्रतिनिधी) येथील नागीण नदीवरील जलसेतूचे म्हणजेच कालव्याच्या पुलाचे लोकार्पण लोकार्पण महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. या कालव्याला आज सुमारे 20 ते 30 वर्षानंतर पालकमंत्री महोदयांच्या प्रयत्नांनी पाणी सुटले आहे. या पाण्याचे जलपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कालव्यामुळे यामुळे ५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. याचा लाभ बोरगाव बुद्रुक , बोरगाव खुर्द, टोळी आणि बांभोरी शिवारातील शेतकर्यांना होणार असून या भागाचा कायापालट होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख जनाबाई पाटील, बोरगाव बुद्रुकचे सरपंच नाना मोरे, उपसरपंच नितीन पाटील, आयोजक भैय्या मराठे, प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर मराठे, ज्ञानेश्वर मराठे, गोकुळ पाटील, माधव मराठे, किशोर मराठे, समाधान मराठे, विनोद मराठे, संदीप मराठे, लक्ष्मण मराठे, वासुदेव मराठे, भिकन मराठे, पिंटू पाटील, गोविंद पाटील, आदींची उपस्थिती होती.
ना. गुलाबराव पाटील यांनी अंजनी धरणावरून बोरगावसह परिसरात १० किलोमीटरचा कालवा मंजूर केला होता. यामुळे बोरगाव बुद्रुक व खुर्द तसेच टोळी, बांभोरी येथील शेतकर्यांना लाभ होणार होता. यामुळे तब्बल ५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार होती. मात्र कालवा पूर्ण झाला असला तरी जलसेतूच्या अभावामुळे फक्त ६ किलोमीटरपर्यंतच कालव्यातून पाणी जात होते. शेतकर्यांची ही समस्या लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी २ कोटी ३१ लक्ष निधी मंजूर करून जलसेतूचे काम तातडीने पूर्ण केले. यामुळे आता पूर्णच्या पूर्ण म्हणजे १० किलोमीटरपर्यंत कालव्यातून शेतकर्यांना पाणी मिळणार आहे. याचा परिसरातील शेतकर्यांना लाभ होणार आहे. यातच सुदैवाने अंजनी धरण पूर्ण भरल्याने आवर्तन मिळणार असल्यामुळे या कालव्याच्या माध्यमातून परिसराचा कायापालट होणार आहे.