धरणगाव (प्रतिनिधी) पालिका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी केला आहे. मुख्याधिकारी या कामी अकार्यक्षम ठरले आहेत असे ते म्हणाले. या वेळी वाघमारे यांनी आकडेवारीसह मुद्देसूदपणे पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. ते आज एका पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, मुख्याधिकारी अक्षम असून ते चांगलं काम करतील तर मी त्यांचा ५ हजार रुपये देवून सत्कार करेल, असे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन म्हणाले.
दीपक वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, धरणगाव शहराचे पाणी पुरवठा धावडा येथून होतो. मुख्य जलवाहिनीतील अडचणींमुळे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही, अशी कारणे मुख्याधिकारी सांगत असतात. परंतु धरणगाव शहराची लोकसंख्या 50 हजार आहे. त्यामध्ये अधिकृत आणि अतिक्रमणसहित 7429 घरे असून नळ कनेक्शन 5000 आहेत. गावामध्ये ६ पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. तर फिल्टर प्लांटच्या पाण्याची टाकीची क्षमता दहा लक्ष लिटर आहे. दुसऱ्या टाकीची क्षमता नऊ लाख लिटर टाकी नेहरूनगरमध्ये सुद्धा आहे. त्यापैकी एक जीर्ण असून धरणगावातील संजय नगर भागात दोन पाण्याच्या टाक्या आहेत.त्यात संजय नगरमध्ये दहा हजार लिटर तर गौतम नगरमध्ये 60 हजार लिटर क्षमतेची एक पाण्याची टाकी असून सर्व मिळून पाण्याच्या टाक्याची क्षमता 19 लाख 80 हजार इतकी आहे.
धावडा येथून 135 एचपीचे दोन पंप चालु असताना त्यांची क्षमता 20 तास पाणी चढवण्याची असून सुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. दोन पंप 6 लाख लिटर पाणी देऊन शकत शकतात. तसेच तासी 3.20 पाणी उचल होऊ शकते. तसेच 20 तास पंप चालू राहिल्यास 60 लाख लिटर पाण्याची उपलब्धता होऊ शकते.
पूर्ण धरणगाव शहरात एकाच वेळेस पाणी दिले तर 54 लाख लिटर पाणी लागते.
फिल्टर प्लांट सोबतच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकी सुवर्ण जयंती नगर योजनेअंतर्गत चाळीस कोटी रुपयांची तरतूद केली होती. ते काम तातडीने चालू करावे. तसेच आमच्या माहितीप्रमाणे टाक्याची पाण्याची टाकी 6.50 लिटरचे आहे. तसेच 83 हजार मीटर अंतर्गत पाइपलाइन टाकायची आहे.
नपा नविन पाण्याची टाकी विद्युत कॉलनी येथे बनवणार आहेत. तरी ती पाण्याची टाकी मोठा माळीवाडा साखर विहीर किंवा जुन्या कोर्टाजवळ बांधण्यात यावी. कारण मुख्य अडचणी रेल्वेलाईन ओलांडून पाईपलाईन पोहोचवणे. तसेच कॉलनी परिसरातील फक्त महात्मा फुले नगर असे 50 ते 60 घरे येतात. बाकीच्या कॉलनी परिसर ग्रामपंचायत हद्दीत आहेत. तसेच तिथं हेडगेवार ग्रामपंचायत तयार होत आहे. तेथील नागरिक नगरपालिकेच्या कुठलाही कर भरत नाही. त्यामुळे जे नागरिक कर भरतात त्यांना पाणी पुरवठा व्हायला हवा. म्हणजे गावातच पाण्याच्या टाक्या झाल्या पाहिजेत,असेही वाघमारे म्हणाले.
नपाने लावलेल्या सरसकट १५०० रु. पाणीपट्टी बाबत ज्ञानेश्वर महाजन, दिपक वाघमारे यांनी खुलासा केला की ही वाढ २०१२ मधील असून त्यावेळी आम्हीच ती कमी करुन लावली आहे. आता नपाने निर्णय घेतला तर ते कमी खरु शकतात असं ते म्हणाले. मुख्याधिकारी अक्षम असून ते चांगलं काम करतील तर मी त्यांचा ५ हजार रुपये देवून सत्कार करेल असे ज्ञानेश्वर महाजन म्हणाले. यावेळी दीपक वाघमारे, ज्ञानेश्वर महाजन,शहराध्यक्ष नीलेश चौधरी संभाजी धननगर मोहन पाटील रवींद्र देवरे सिताराम मराठे सागर वाजपेयी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.