TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘स्वबळाचा नारा आपणही देऊ, हा आपला हक्क’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला लगावला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मुख्यमंत्र्यांचं स्वबळावर भाष्य

अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता. मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर… जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाचं आहे, असं ठाकरे म्हणाले.

ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात

निवडणुका येतात आणि जातात. ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात. बंगाली माणसांनी निर्भिडपणे मतं मांडलं, स्वत्व काय असतं हे बंगालने दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता कशी जपायची याचं उदाहरण बंगालने घालून दिलं.

संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला ?

मुख्यमंत्री म्हणाले की, जेंव्हा शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तेंव्हा देखील शिवसेनाप्रमुख पुढे गेले. संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला? संकटाच्या छाताडावर चाल करुन जाणे ही आमची शिकवण आहे, असं ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत जे दुर्दैवाने पराभुत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यांना मी सांगितलं पराभूत शब्द काढा, जो खचला तो संपला. आपल्या हिंदुस्थानचा पाया हा संघराज्याचा भाषावार प्रांत रचनेचा आहे हे आपण विसरता कामा नये. हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व! सर्वप्रथम देशाभिमान मग प्रादेशिक अस्मिता असं ते म्हणाले. टीका करणारे तुम्ही काहीही केलंत तरी टीका करणार. तुमच्या मनाला जे पटत ते करा. पूर्वी या खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणस तिथे घुसवली. मनगट आहेत पण त्यात ताकद नाही तर फायदा नाही. मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी तुझ्या मनगटात ताकद आहे तलवार पेलवण्याची ही जाणीव करून दिली तेंव्हा मराठी माणुस पेटुन उठला, असं ते म्हणाले.

स्थानिय लोकाधिकार समितीच्या शिवराय संचलन कार्यक्रमात मी जातो. त्या भागात चौफेर पाहतो. चौफेर पाहताना मोठमोठ्या ऑफिसकडे, इमारतींकडे, गच्चीतुन, खिडकीतुन, झाडावर चढुन लोक पहात असतात. हे अप्रुप आहे. आम्हीं एकमेकांना भेटल्यावर जय महाराष्ट्र बोलतो, पण ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’, देश आधी. देशाचा पाया हा प्रादेशिक अस्मितेचा आहे. जर या अस्मितेवर घाला आला तर संघराज्याच्या पायावर घाला होतोय, असं ते म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्सवानिमित्त अभिषेकासह विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा*

August 7, 2025

चौघांनी मिळून केला युवकाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 18, 2023

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025

पाचोरा हादरलं : प्रेमी युगलाने सोबत संपवलं आयुष्य !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group