पुणे (वृत्तसंस्था) ‘भाजपची संघटना मजबूत करणं हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. कोरोनाच्या काळात प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. ती उणीव यावर्षी भरून काढली जाईल. येत्या १५ जानेवारीला साडे चौदा हजार ग्रामपंचायती, त्यानंतर ९२ नगरपालिका, ५ महापालिका व जिल्हापरिषदांच्याही निवडणुकात आहे. त्यात जास्तीत जास्त यश मिळवणं हा आमचा प्रयत्न राहील,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘राज्यातील अन्य निवडणुकांप्रमाणेच, मुंबई महापालिका हे भारतीय जनता पक्षाचं नव्या वर्षातलं लक्ष्य आहे. यावेळी थेट दिल्लीहून मुंबईवर लक्ष दिलं जाईल,’ असं सांगत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपची पुढची रणनीती उघड केली. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नव्या वर्षात आपले संकल्प काय असतील, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. ‘भाजपची संघटना मजबूत करणं हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. कोरोनाच्या काळात प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. ती उणीव यावर्षी भरून काढली जाईल. येत्या १५ जानेवारीला साडे चौदा हजार ग्रामपंचायती, त्यानंतर ९२ नगरपालिका, ५ महापालिका व जिल्हापरिषदांच्याही निवडणुकात आहे. त्यात जास्तीत जास्त यश मिळवणं हा आमचा प्रयत्न राहील,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना पाटील यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘मुंबई महापालिका ही काही जणांची जहागीर झाली आहे. या सगळ्यामध्ये मुंबईकरांच्या समस्या बाजूलाच राहिल्या आणि यांचं राजकारण मजबूत होत गेलं. मात्र, ही मजबुती सुद्धा आता टिकणार नाही. राज्यातलं एक वर्षाचं हे अत्यंत अनैसर्गिक सरकार ही मजबुती घालवून बसणार आहे,’ असा दावा पाटील यांनी केला.