धरणगाव (प्रतिनिधी) ओला दुष्काळ जाहीर करा व हेक्टरी ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळावी. तसेच ई-पीक पाहणी सक्तीचे करू नये, कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे मोबाईल देखील नाही. त्यासाठी पूर्वीप्रमाणे तलाठीने शेतकऱ्याचा पीक पेरा लावावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीकडून धरणगाव तहसीलदार नितीन देवरे यांच्याकडे नुकतेच निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी सी आबा पाटील, ओबीसी जिल्हा अध्यक्ष अॅड. संजय महाजन, तालुका अध्यक्ष जिजाबराव आबा, शेखर दादा, जगनभाऊ हिंगोंने, अॅड. बापुसाहेब वसंतराव भोलाने, पुनिलालअप्पा महाजन, एस पी बापु, किशोर झवर, ता. सरचिटणीस सुनिल पाटील, ओबिसी तालुका अध्यक्ष सुनिल चौधरी, शेतकरी आघाडी अध्यक्ष संतोष चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, सुनील चौधरी, सुदाम मराठे, टोनी महाजन, कन्हैया रायपूरकर, पिंटू पाटील, जुलाल भोई, देवा महाजन, सचिन पाटील, किशोर माळी, डॉ. विजय पाटील, संजय पाटील, बापु शिरसाठ, राजू महाजन, विक्की महाजन, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.