भुसावळ/शिरपूर ( प्रतिनिधीि ) शिरपूर तालुक्यातील गांजा शेतीवर पोलीस यंत्रणेने पुन्हा धडक कारवाई करीत तब्बल दोन कोटी 20 लाख रुपये किंमतीचा 11 हजार किलो गांजा जप्त केल्याने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. संशयीत कैलास भावसिंग पावर (रुपसिंगपाडा आंबा, ता.शिरपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पसार झाला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांना गांजा शेतीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार व शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना सूचित केल्यानंतर दोन टीम तयार करण्यात आल्या. आरोपी कैलास पावरा हा कसत असलेल्या शेतजमिनीवर पथकाने छापा मारत दोन कोटी 20 लाख रुपये किंमतीचा 11 हजार किलो ओला गांजा जप्त केला. हवालदार पवन गवळी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहा.निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सुनील वसावे, प्रकाश पाटील, मनोज कचरे, मिलिंद पवार, कैलास जाधव, हवालदार पवन गवळी, हवालदार अनिल चौधरी, हवालदार आरीफ पठाण, मनोज नेरकर, चेतन बोरसे, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी आणि चालक सतीश पवार, चालक कॉन्स्टेबल सागर कासार आदींच्या पथकाने केली.